AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार लोकांना आयुष्यात कधीच मदत करू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समजात असे देखील काही लोक असतात, काहीही झालं तरी त्यांना कधीच मदत करता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार लोकांना आयुष्यात कधीच मदत करू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 7:31 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात मदत ही या जगातील सर्वात श्रेष्ठ भावना आहे. जो व्यक्ती गरजू असतो, ज्याला खरच मदतीची आवश्यकता आहे, अशा लोकांना तुम्ही तुमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी मदत ही केलीच पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा इतरांना मदत करता, तेव्हा तुम्हाला देखील मदत करण्यासाठी इतरांचे हात पुढे येतात. एखादा व्यक्ती जर खरच अडचणीत असेल तर त्याला मदत ही केलीच पाहिजे, असं चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे. परंतु पुढे चाणक्य असे देखील म्हणतात की समाजात असेही काही लोक असतात, ज्यांना काहीही झालं तरी कधीच मदत केली नाही पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही अशा लोकांना मदत करता, तेव्हा तुम्ही अडचणीमध्ये येतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मूर्ख लोक – चाणक्य म्हणतात गरजू लोकांना मदत केलीच पाहिजे, त्यामध्ये दुमत नाही. परंतु समाजात असे देखील काही लोक असतात ज्यांना तुम्ही कितीही मदत केली तरी त्याचा उपयोग शून्य असतो. अशा लोकांना मदत केल्यामुळे फायदा तर काही होत नाही, उलट तुमचे पैसे आणि वेळ वाया जातो. त्यामुळे कधीही मदत करताना या गोष्टी लक्षात घ्याव्यात. मूर्ख लोकांना कधीही मदत करू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, अशा लोकांना देखील कधीही मदत केली नाही पाहिजे, कारण अशा लोकांना तुम्ही केलेल्या उपकारांची, मदतीची जाणीव नसते, असे लोक वेळ पडली की आपला खरा रंग दाखवणारच, अशा लोकांना जर तुम्ही एखाद्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी गेलात तर त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा लोकांना कधीही मदत करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कृतघ्न लोक – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना उपकाराची जाणीव नसते, जे लोक त्यांची वेळ टळण्यानंतर तुम्हाला धोका देऊ शकतात, अशा लोकांना कधीही मदत करू नये.

व्यसनी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक व्यसनी आहेत, एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत, अशा लोकांना मदत करून उपयोग होत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू