
बॉलिवूडमधील काही किस्से कायमच चर्चेत असतात. त्यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध किस्से म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे आहेत. रेखा या निमंत्रित नसतानाही अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला पोहोचल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांचा 60 वा वाढदिवस मुंबईतील एक आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आला. या वाढदिवसाला अनेक नामवंत लोकांना आमंत्रण देण्यात आले.

या वाढदिवसाला रेखा यांना आमंत्रण नव्हते. मात्र, रेखा या न बोलवता फरजानासोबत वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचल्या होत्या. रेखाला तिथे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

यावेळी रेखा यांचे फोटो काढले जात होते. मात्र, त्यांना फोटो काढून द्यायचे नसल्याने त्या चक्क बाथरूममध्ये लपून बसल्या आणि जोपर्यंत मीडियावाले जात नाहीत तोपर्यंत त्या बाहेर आल्या नाहीत.

काही तासांनंतर त्या बाहेर आल्या. मात्र, रेखा यांनी असे का केले हे कळू शकले नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे किस्से कायमच चर्चेत असतात.