
फिल्मीज्ञानशी बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली की, डायरेक्टर मला खूप विचित्र प्रश्न विचारायचे. जसं की, माझी कप साइज काय आहे?. मी हैराण व्हायची, मला प्रश्न पडायचा याचं काय कनेक्शन आहे. कप साइज आणि फिल्म स्टोरीचा काय संबंध आहे?

म्हणजे लेखकाने स्क्रिप्टमध्ये असं काय लिहिलं की, हिरॉइनची कप साइज ए, बी किंवा सी पाहिजे. बायचान्स कप साइज नसेल, मग ती चित्रपटाची हिरॉइन बनण्या लायक नाही का? मी कास्टिंग डायरेक्टर्सना भेटून खूप अनकम्फर्टेबल व्हायची असं शर्लिन चोप्राने सांगितलं.

शर्लिन चोप्राने आधी सुद्धा सांगितलय की, इंडस्ट्रीमध्ये डिनरचा अर्थ कॉम्र्पोमाइज असतो. तिने अनेकदा अशा प्रकारांचा सामना केला, जिथे लाज वाटली.

फिल्ममेकर्सचे इरादे लक्षात आल्यानंतर मी त्यांना मना करायची. मला अशा गोष्टींमध्ये रस नव्हता. मी ठरवलं की, मला डिनरला जायचच नाही, असं शर्लिनने सांगितलं.

शर्लिन चोप्रा आजच्या तारखेला इंटरनेट सेनसेशन आहे. ती इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करत असते. त्याशिवाय गेम, कामसूत्र 3डी आणि पौरुषपुर सारखे चित्रपट आणि सीरीजमध्ये काम केलय.