
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक जण हे सलमान खान याच्या घरी पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले.

आता नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही देखील सलमान खान याच्या घरी आपल्या आईसोबत पोहचलीये. याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांचे काैटुंबिय संबंध आहेत. हेच नाही तर शिल्पा शेट्टी हिच्या वडिलांसोबत एकेकाळी सलमान खान हा दारू पिण्यासही बसायचा.

शिल्पा शेट्टीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सलमान खान हा ढसाढसा रडत होता. आता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर शिल्पा आईसोबत सलमानच्या घरी पोहचली.

गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. त्यामध्येच आता सलमानच्या घराबाहेर हा गोळीबार झाला.