
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता देखील हटके लूकमध्ये शिल्पा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटो पोस्ट करत शिल्पा हिने Retro Charm… Modern vibe... असं कॅप्शन लिहिलं आहे.

शिल्पा हिच्या नव्या लूकवर अनेकांनी प्रेम देखील व्यक्त केलं आहे. शिल्पा तुझी बरोबरी कोणीच करु शकत नाही... असे कमेंट करत अनेकांनी शिल्पा हिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.

सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.