
विद्या बालनने अनेक हिट चित्रपट दिलेत. परिणिता, द डर्टी पिक्चर हे चित्रपट विद्याची खास ओळख. दोन्ही सिनेमांमध्ये एकदम परस्पर भिन्न भूमिका तिने साकारल्या.विद्या बालनचा यशा पर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. विद्या मोकळेपणाने आपले विचार मांडण्यासाठी ओळखली जाते.

मागे विद्या बालनला एका मुलाखतीत पॉर्न फिल्म आणि सेक्सबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले. त्यावेळी तिने नेहमीच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे मोकळेपणाने आपले विचार व्यक्त केलेले. विद्या बालनने समदीश भाटियाचं चॅनल 'अनफिल्टर्ड बाई समदीश'मध्ये पॉर्न चित्रपटांसंबंधी झालेल्या प्रश्नावर आपले विचार मांडलेले.

समदीशने विद्याला विचारलं की, तू पॉर्न चित्रपट पाहतेस का?. त्यावर विद्याने नाही असं उत्तर दिलं. "खरं सांगायच झाल्यास मला कधीही पॉर्न आयडीया आवडली नाही. कारण मला दोन लोकांना सेक्स करताना बघायला आवडत नाही" असं विद्या म्हणालेली.

जर, कुठल्या चित्रपटात सेक्स सीन आहे आणि तो चांगल्या पद्धतीने शूट केला असेल. त्याच्यामागे चांगली गोष्ट असेल, तर मला पहायला काही अडचण नाही. मी कधीच पॉर्न बघितलं नाही. फक्त एखादा सीन पाहिला असेल,ते पाहून असं वाटलं की, महिलांना बॉडीच्या रुपात दाखवतात.

पॉर्नमध्ये कुठली स्टोरी नसते, फक्त सेक्स असतो. पॉर्न पाहून मी कधी टर्न ऑन होऊ शकत नाही. म्हणून मला पॉर्न पहायला आवडत नाही असं विद्या बाललने उत्तर दिलेलं.