
चित्रपट, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्याचं पडद्यावर एक नातं असतं. पडद्यामागे दुसरं नातं असतं. आज आम्ही बॉलिवूडच्या हिट दीर-वहिनीच्या नात्याबद्दल बोलत आहोत. खऱ्या आयुष्यात दीर-वहिनी असेल, तरी प़डद्यावर कधी प्रियकर-प्रेयसी कधी पती-पत्नीचे रोल केले. 5-10 नाही, तर दोघांनी तब्बल 15 चित्रपटात एकत्र काम केलं. कोण आहे ही जोडी?.

आम्ही त्या जोडीबद्दल बोलतोय, ज्यांनी आजही एकत्र काम केलं असतं तर प्रेक्षकांची थिएटरमध्ये रांग लागली असती. आम्ही अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या जोडीबद्दल बोलतोय. अनिल कपूर आजही चित्रपट सृष्टीत सक्रीय आहेत. त्यांचा फिटनेस चर्चेचा विषय असतो.

अनिल कपूर आणि श्रीदेवी ही 90 च्या दशकातील हिट जोडी होती. लोकांना दोघांची केमिस्ट्री इतकी आवडली की, प्रेक्षकांना सतत या जोडीला पहायची इच्छा असायची. त्यामुळेच दोघांनी 5-10 नाही, तर तब्बल 15 चित्रपटात एकत्र काम केलं.

अनिल कपूर आणि श्रीदेवीने पहिल्यांदा मिस्टर इंडियामध्ये काम केलं. 1987 साली हा चित्रपट आलेला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर 'हीर रांझा', 'लम्हे', 'मिस्टर बेचारा','गुरुदेव', 'जोशिले', 'राम-अवतार', 'रूप की रानी चोरों का राजा', 'जांबाज', 'कर्मा', 'लाडला', 'जुदाई', 'सोने पे सुहागा' आणि 'आसमान से गिरा' अशी हिट चित्रपटांची मालिकाच लावली.

हीर रांझा चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडलेली. श्रीदेवीला हीर तर अनिल कपूरला रांझाच्या रोलमध्ये पाहून प्रेक्षक इमोशनल झालेले. जुदाई चित्रपटात तर श्रीदेवीने अनिल कपूरच दुसरं लग्न लावून दिलेलं. अनिल कपूर आणि श्रीदेवीची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.