Sonu Nigam : इतक्या कमी जागेसाठी गायकाने मोजले 1 कोटी, कुठे खरेदी केलंय नवीन ऑफिस?
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम केवळ त्याच्या आवाजासाठीच नाही, तर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच गाण्याची आवड असलेला सोनू निगम आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आता देखील अभिनेत्याने नवीन ऑफिससाठी 1 कोटी रुपये मोजले आहेत.

सोनू निगमने 1995 मध्ये 'अच्छा सिला दिया' हे त्याचं पहिलं गाणं गायलं. लोकांना हे गाणं इतकं आवडलं की त्याला एकापाठोपाठ एक ऑफर्स येऊ लागल्या. आज, सोनू निगम एका कॉन्सर्टसाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये घेतो. तर जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती किती आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचा मुंबईत एक आलिशान 3 मजली बंगला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये आहे. या घरात म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि जिमचा समावेश आहे.

मुंबई व्यतिरिक्त सोनू निगमचे दुबईमध्येही एक आलिशान घर आहे. त्याची किंमत 25 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, या गायकाची एकूण संपत्ती 350 ते 400 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानलं जातं. पार्श्वगायना व्यतिरिक्त, सोनू निगमने लाईव्ह कॉन्सर्ट, टीव्ही शो आणि रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे, तसेच तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो.

सोनू निगम सध्या त्याच्या मालमत्ता गुंतवणुकीमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने कर्जतमधील आपली जमीन कोट्यवधी रुपयांना विकली होती आणि आता त्याने मुंबईतील अंधेरीमध्ये एक ऑफिस खरेदी केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.

सांगायचं झालं तर, सोनू निगमवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. ही गोष्ट बरीच चर्चेत होती. कारण, शस्त्रक्रियेदरम्यान सोनू निगम बेडवर गाणं गाताना दिसला होता. सोनू निगम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.