PHOTO: गौराईच्या देखण्या मुखवट्यांनी सजली बाजारपेठ, पाहूनच मन प्रसन्न होईल, माहेरवाशीणीच्या आगमनाची उत्सुकता

| Updated on: Sep 11, 2021 | 5:12 PM

महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे महालक्ष्मीचा सण साजरा केला जातो. मात्र श्रद्धेचा गाभा एकच असतो. काही ठिकाणी गौरींना महालक्ष्मी म्हणतात तर कुठे ज्येष्ठा नक्षत्रावर पूजल्या जाते म्हणून त्यांना ज्येष्ठागौरी म्हणतात.

1 / 5
गणेशोत्सवासोबतच रविवारी महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त औरंगाबादच्या बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरीसचे मुखवटे कोथळ्यांवर बसवलेले असतात. नव्या प्रकारचे मखर, कोथळ्या, महालक्ष्मीसाठी साड्या, वेगळ्या प्रकारचे मुखवटेही यंदा बाजारात उपलब्ध आहेत.

2 / 5
महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे महालक्ष्मीचा सण साजरा केला जातो. मात्र श्रद्धेचा गाभा एकच असतो. काही ठिकाणी गौरींना महालक्ष्मी म्हणतात तर कुठे ज्येष्ठा नक्षत्रावर पूजल्या जाते म्हणून त्यांना ज्येष्ठागौरी म्हणतात. मराठवाड्यात गौरीपूजनाची पद्धत दोन प्रकारची आहे. कुठे उभ्या म्हणजे स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून मुखवटे बसवलेले असतात. तर कुठे कलश मांडून धन धान्याची पूजा केली जाते. त्यांनाच बसलेल्या गौरी म्हणतात.

3 / 5
काही घरांमध्ये पितळी मुखवट्यांची परंपरा असते. कोथळ्याही पितळीच असतात. पितळी कोथळ्यांची किंमत 1500 ते 9000 हजार रुपयांपर्यंत आहे. आवाहनाच्या दिवशी गौरींचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते. यावेळी वाजत गाजत कोण आलं.. ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आल्या...  असं म्हणण्याची पद्धत आहे. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर मुखवटे मखरात ठेवून त्यांची सजावट केली जाते.

4 / 5
गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात, ते सजवून गौरींच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो. तसेच त्यांच्यापुढे अनेक धान्यांच्या राशी मांडलेल्या असता. तसेच त्यांच्या मुलांसाठी अनेक प्रकारची खेळणीही समोर मांडली जाते. औरंगाबादच्या बाजारात यानिमित्त अनेक प्रकारची खेळणी, सजावटीसाठीच्या भाज्याही दाखल झाल्या आहेत.

5 / 5
महालक्ष्मीच्या सणाला गौरी माहेरी येतात, असे म्हटले जाते. यावेळी आपल्या घरात आलेल्या गौरीचा अनेक प्रकारे थाट आणि साज-सजावट केली जाते. माहेरवाशीणीचा हा थाट करण्यासाठी घरातील स्त्रिया प्रचंड व्यग्र होतात. सोळा भाज्या, सोळा चटण्या, सोळा पक्वान्न जेवणासाठी असतात.  सोन्याच्या पावलांनी आलेल्या महालक्ष्मीचं रुप डोळ्यात साठवून अखेरच्या दिवशी तिला निरोप दिला जातो.