Stock Market : 1 लाख रुपयांचे झाले 64 लाख, या शेअरने अनेकांना केलं मालामाल, नाव तरी काय?
27 नोव्हेंबर 2020 रोजी या शेअरची किंमत अवघी 61.49 रुपये होती, तर 26 नोव्हेंबर 2026 रोजी ती 3,990.40 रुपयांवर पोहोचली.

शेअर बाजारातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या शेअरने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. गुरुवारी या शेअरमध्ये 5.70 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर आजच्या सत्रात 3,990.40 रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत BSE च्या शेअरमध्ये सुमारे 52 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे.
परदेशी ब्रोकरेज कंपनी HSBC ने BSE च्या शेअरवर सकारात्मक भूमिका घेत 'Buy' रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 4,500 रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केले आहे. बुधवारच्या 3,775.20 रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत शेअरमध्ये आणखी सुमारे 19 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षांत BSE च्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 6,390 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या शेअरची किंमत अवघी 61.49 रुपये होती, तर 26 नोव्हेंबर 2026 रोजी ती 3,990.40 रुपयांवर पोहोचली. त्यामुळे त्यावेळी केलेल्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता सुमारे 64.89 लाख रुपये झाले असते.
BSE ने आपल्या भागधारकांना आतापर्यंत दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. मार्च 2022 मध्ये कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित केले होते. त्यानंतर मे 2025 मध्येही याच प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले. जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, त्यांना या निर्णयाचा फायदा झाला. फायदा झाला.
सध्या BSE चे बाजार भांडवल 1,62,762 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)