
इलेक्ट्रीक कारची मागणी वाढत आहे: देशात इलेक्ट्रिक कारना सध्या मोठी मागणी आहे.इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे आणि पर्यावरण जागरूकता तसेच सरकारी सबसिडीमुळे लोकांचे इलेक्ट्रीक कारकडे वळले आहे. परंतू सध्या दहा लाखांच्या रेंजच्या कमी कार बाजारात आहेत. या फोटो गॅलरीत आपण भारतातील 3 सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार्सना पाहणार आहोत ज्या लो बजट असूनही दमदार फिचर्सवाल्या आहेत.

MG Comet EV:किंमत: 7 लाख रुपये – 9.84 लाख रुपये (एक्स-शोरूम)- MG Comet EV ही सध्या भारतातील सर्वात बजेट फ्रेंडली इलेक्ट्रीक कार आहे.या कारच कॉम्पॅक्ट आकार आणि शहरातील ट्रॅफीक आणि पार्किंगला लागणारी कमी जागा म्हणून हिला प्रचंड मागणी आहे. या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी क्षमता असून ही कार 230 किमीची रेंज देत आहे.या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी बॅटरी-एज-ए-सर्व्हीस मॉडल देते. ज्यात 4.99 लाख रुपयांत कार आणि 2.5/किमीच्या हिशोबात भाड्यावर मिळते.

Tata Tiago EV:किंमत: 7.99 लाख – 11.14 लाख रुपये (एक्स-शोरूम): Tata Tiago EV एक विश्वासार्ह आणि सुविधा असलेली ईलेक्ट्रीक आहे.ही कार दोन वेरिएंट (XE MR आणि XT MR) मध्ये मिळते आणि तिची किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे.या कारची बॅटरी क्षमता 19.2 kWh आहे.या कारला 315 किमीपर्यंत रेंज मिळते. या कारला Tataचे नाव असल्याने ती विश्वाससार्ह आणि सर्व्हीस नेटवर्क चांगला पर्याय आहे.

Tata Punch EV: किंमत: 9.99 लाख – 14.44 लाख रुपये (एक्स-शोरूम): SUV ज्यांना आवडते त्यांच्यासाठी Tata Punch EV एक चांगला ऑप्शन आहे. या कारचा Smart वेरिएंट 9.99 लाख रुपयांत येतो.यात 25 kWh बॅटरीचा पर्याय आहे. त्यामुळे या कारला 265 किमीची रेंज मिळते. पंचचा स्पोर्टी लुक आणि उंच ग्राऊंड क्लिअरन्स हिला वेगळी स्वतंत्र ओळख देते.

तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट? - तुम्ही शहरात राहत असला तर पार्किंगची समस्या पाहाता छोटी, पार्किंग-फ्रेंडली कार हवी असेल तर MG Comet EV तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.जास्त रेंज आणि फॅमिलीसाठी चांगला ऑप्शन पाहीजे असेल तर Tata Tiago EV बेस्ट आहे, आणि SUV लुक आणि दमदार बॅटरीसह काही प्रीमियम हवे असेल तर Tata Punch EV वर नजर टाका. 10 लाख रुपयांच्या आत या कार येऊ शकतात.