
मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू आहे. तर 25 जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता बुढार नदीवर अपघात झाला आहे.

अपघातग्रस्त बस डोंगरगाव आणि दसंगादरम्यान असलेल्या बुढार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख आणि गंभीर जखमींना ५० हजार तर किरकोळ जखमी प्रवाश्यांना २५ हजार रूपयांची मदत जाहीर मध्यप्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

मृतांमध्ये ३ मुले, ९ महिला, १० पुरुष आहेत. बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. नदीत पाणी नव्हते. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिले आहे.

शारदा ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. बसचे काच तोडून त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी बसचे रजिस्ट्रेशन आणि फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश काढले. तसेच लांब पल्याच्या बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले.