
दोन कपल्स कुठेतरी फिरायला जातात किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी जातात तेव्हा अनेकदा हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय स्वीकारला जातो. परंतु काही ठिकाणी अविवाहित कपलला हॉटेलमध्ये राहण्यास रुम दिली जात नाही.

सोबतच कधी-कधी पोलीसही त्रास द्यायला लागतात. त्यामुळेच लग्न न झालेल्या कपलला हॉटेलमध्ये राहायचे असेल तर त्यासाठीचे नियम काय आहेत? हे जाणून घेऊ या..अविवाहित पुरुष आणि अविवाहित स्त्री सोबत एका हॉटेलमध्ये राहू शकतात.

लग्न न करता दोघांनी हॉटेलमध्ये एकत्र राहणे हे बेकायदेशीर नाही. तुम्ही हॉटेलमध्ये एकत्र राहात असाल तर तुम्हाला पोलीसही काहीच करू शकत नाहीत. हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असतो. कायद्यानुसार सहमतीने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही.

भारतीय संविधानात प्रत्येकाला आपापल्या आवडीने जगण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 21 अंतर्गत भारतीय नागरिकांना जगण्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे दोन पौढ व्यक्ती सहमतीने हॉटेलमध्ये एकत्र राहात असतील तर त्यांना कोणीही काहीही करू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयानेदेखील सहमतीने हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रौढ कपलच्या त्रास दिला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिलेला आहे. वैध ओळखपत्र दाखवून कपलला हॉटेलमध्ये राहता येते. हॉटेलचे प्रशासनही तुम्हाला एकत्र राहण्यापासून रोखू शकत नाही.