Khesari Lal Yadav : विवाहित अभिनेत्रीकडून किसची मागणी, अभिनेत्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा; काय घडलं?
Khesari Lal Yadav : अभिनेता खेसारी लाला यादवनं विवाहित अभिनेत्रीकडून किसची मागणी केली असून अभिनेत्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवचे स्टेज शो व्हायरल होतात. त्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र, त्याच्या शोमधील अश्लीलता कोणालाही लाजवेल. अभिनेत्याच्या अलीकडील परफॉर्मन्सचंच उदाहरण घ्या. खेसारीनं स्टेजवर अश्लीलतेची मर्यादा ओलांडली. यावरून अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.
खेसारीनं मर्यादा ओलांडली
रितू सिंग खेसारीसोबत शोमध्ये आली होती. अभिनेत्री विवाहित असूनही खेसारीनं या विवाहित नायिकेसोबत स्टेजवर मर्यादा ओलांडण्याची कोणतीही कसर सोडली नाही. खेसारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तो स्टेजवर रितूसोबत रोमँटिक होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कधीकधी तो तिच्याकडे अगदी जवळून पाहतो. कधीकधी तो शर्ट न घालता रितूला मिठी मारतो. तो शेकडो लोकांसमोर रितूसोबत जवळीक साधतो. एका व्हिडिओमध्ये, तो रितूच्या इतका जवळ येतो की, तो तिला किस करेल असं वाटतं. खेसारीनं मंचावर रितूकडे किस करण्याची मागणीही केली.
खेसारी म्हणाला, ‘मी तिला चित्रपटात अनेकदा किस केलं आहे. तुम्ही लोकांनी पाहिलंय ना? जर मी तिला चित्रपटात किस केलं, तर बाहेर किस करू शकत नाही का?’ हे ऐकून रितू सिंगला धक्का बसला. ती म्हणाली, ‘मुळीच नाही.’ खेसारी म्हणाला, ‘ठीक आहे, मग मी करणार नाही.’ एका व्हायरल व्हिडिओमध्ये, खेसारी अभिनेत्रीला मिठी मारतो. तो तिला बराच वेळ धरून ठेवतो. अभिनेत्री त्याला सोडायला सांगतेय. पण तरीही अभिनेता अभिनेत्रीसोबत जवळीक साधताना दिसतोय.
View this post on Instagram
खेसारी लाल यादववर नेटकऱ्यांचा संताप
खेसारी यादवचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एकानं म्हटलं, ‘यामुळेच भोजपुरी इंडस्ट्रीचं नाव खराब आहे.’ दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘रितूचा नवरा त्याला काय म्हणेल?’ काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाही सुनावलं आहे. खेसारीनं सार्वजनिकरित्या मर्यादा ओलांडण्याची ही पहिली वेळ नाही. असं वर्तन अनेकदा भोजपुरी स्टेज शोमध्ये पाहायला मिळतं.
