AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईला पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोलियम जेलीची चोरी; सहा आरोपींना अटक

दुबईला कंटेनरमधून पाठवण्यात येणारी पेट्रोलियम जेलीची मधल्यामध्ये कंटेनरमधून चोरी करताना सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

दुबईला पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोलियम जेलीची चोरी; सहा आरोपींना अटक
stealing petroleum jell
| Updated on: Nov 18, 2026 | 9:29 PM
Share

तळोजा येथील रिफायनरीतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरमधून दुबईला पाठवण्यात येणाऱ्या महागड्या पेट्रोलियम जेलीची चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी कंटेनरमधून पाइपच्या साहाय्याने सुमारे ४०० लिटर पेट्रोलियम जेली काढून महिंद्रा पिकअप व्हॅनमध्ये ठेवलेल्या बॅरलमध्ये भरली होती. जप्त करण्यात आलेल्या जेलीची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी कंटेनर, पिकअप व्हॅन आणि ट्रेलरसह एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पुनीत कॉर्नर येथील पार्किंगमध्ये एका कंटेनरमधून पेट्रोलियम पदार्थ काढला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी कंटेनरमधून पाइपच्या साहाय्याने पेट्रोलियम जेली काढून ती पिकअप व्हॅनमधील बॅरलमध्ये भरली जात असल्याचे आढळून आले.

पुढील तपास सुरु

तपासादरम्यान हा कंटेनर तळोजा येथील गांधार ऑइल रिफायनरीमधून आला असून, जेएनपीटीमार्गे तो दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. कंटेनरमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा माल होता. आरोपी चोरी केलेली जेली कुठे विकणार होते आणि या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत असल्याचे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण