
मोठी बातमी समोर येत आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर मध्यरात्री एका इनोव्हा कारने अचानक पेट घेतला, या घटनेत ही कार जळून खाक झाली आहे.

राज ठाकरे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या या कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अद्याप नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

आग लागली तेव्हा गाडीत चालक नव्हता, त्यामुळे दुदैवानं या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र कारचं प्रचंड नुकसान झालं असून, वाहन जळून खाक झालं आहे.

ही घटना शिवतीर्थच्या अगदी समोरच घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपाळ उड्याचं पहायला मिळालं, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

समोर आलेल्या माहितीनुसार ही कार आगीच्या घटनेनंतर कुर्ला येथे कंपनीच्या गॅरेजला नेण्यात आली आहे.

दरम्यान या गाडीला जिथे आग लागली होती, जिथे या गाडीनं पेट घेतला होता, त्या जागेचा संबंधित कारच्या कंपनीकडून आता पंचनामा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारनं अचानक पेट घेतल्यामुळे काही काळ पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली, या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं आहे.