
Maruti Cars Discount : जून महिन्यात मारुतीच्या बहुतांश मॉडल्सवर सवलत मिळेतय. पण सर्वात जास्त डिस्काऊंट Maruti Grand Vitara वर मिळतोय. या गाडीच्या स्ट्राँग हायब्रिड मॉडल्सवर 1.4 लाखाचा आणि अन्य वेरिएंटसवर 65 हजार रुपये वाचवण्याची संधी आहे.

Tata Cars Discount : टाटा मोटर्सच्या निवडक गाड्यांवर लाखो रुपयांची सवलत मिळतेय. सर्वात जास्त डिस्काऊंटचा फायदा Tata Nexon EV वर आहे. या कारच 2023 मॉडल खरेदी करण्यावर 1.35 लाख रुपयापर्यंत आणि 2024 मॉडेलवर 85 हजार रुपये वाचवले जाऊ शकतात.

Tata Nexon EV Price : या इलेक्ट्रिक कारच्या बेस वेरिएंटची किंमत 14 लाख 49 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारच्या टॉप वेरिएंटसाठी 19 लाख 29 हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

MG Cars Discount: एमजी मोटर्सच्या दोन गाड्यांवर 1 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. MG Astor आणि MG Gloster खरेदी करण्यावर 1 लाखापर्यंत सवलत आणि 50 हजार रुपयापर्यंत एक्सचेंज डिस्काऊंटचा फायदा मिळू शकतो.

MG Astor Price : एमजी मोटर्सच्या या कारची किंमत 9,98,000 रुपयापासून 18,07,800 रुपयापर्यंत (एक्स-शोरूम) आहे. MG Gloster ची किंमत 38,79,800 रुपयापासून (एक्स-शोरूम) 43,86,800 रुपया (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.