मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, भर उन्हात प्रवासी ट्रॅकवर, लोकल एकाच ठिकाण अडकून..
ऐन सोमवारच्याच दिवशी लोकलने खेळखंडोबा केला. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. अनेक वेळापासून लोकल एकाच ठिकाणी उभ्या आहेत. प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली.

मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मुलुंड-ठाणेदरम्यान OHE तार लटकली. घाटकोपरमध्ये प्रवासी ट्रॅकवरून चालत आहेत. मध्य रेल्वेच्या मुलुंड-ठाणे दरम्यान डाउन लोकल मार्गावर सकाळी 9.23 च्या सुमारास OHE ला बाहेरील तार लटकत असल्याची घटना.
दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० वाजता OHE ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 10:48 वाजता पॉवर ब्लॉक रद्द करून डाउन लोकल मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आली.
काही ठिकाणी सिग्नल मिळाल्यानंतरही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळतंय. लोक ट्रॅकवरून चालत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
मुलूंड ते ठाणे आणि विक्रोळी ते भांडूप दर्म्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. फास्ट ट्रॅकवर लोकल सेवा विस्कळीत एकाच ट्रॅकवर अडकल्या सगळ्या ट्रेन्स.
कांजूरमार्ग इथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक रेल्वे प्रवाशांचा खोळंबा , आॅक्टोबर हिटमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट.