
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारताने बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवला. यात शुभमन गिलच योगदान महत्त्वाच होतं. त्याने नाबाद 101 धावा फटकावल्या. मोहम्मद शमीने पाच विकेट काढून टीम इंडियाच काम थोडं सोप केलं.

कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे विकेट झटपट गेल्यानंतर शुभमन गिलने संयमी खेळ दाखवला. केएल राहुलच्या साथीने त्याने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. शुभमनची ही वनडेमधील 8 वी सेंच्युरी आहे.

गिल आणि राहुलने पाचव्या विकेटसाठी नाबाद 87 धावांची भागिदारी केली. टीम इंडियासमोर विजयासाठी 229 धावांच टार्गेट होतं. केएल राहुलच इंग्लंड विरुद्ध प्रदर्शन आणि बांग्लादेश विरुद्ध स्टम्पसपाठी कामगिरी समाधानकारक नव्हती.

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल त्याच्या अर्धशतकाच्या जवळ होता. तो 47 धावांवर खेळत होता. पण त्याने स्वत:च्या अर्धशतकाची परवा न करता शुभमन गिलला शतक पूर्ण करु दिलं. राहुलच्या या कृत्याने इंटरनेटला जिंकून घेतलं.

केएल राहुलच्या या कृतीच इंटरनेटवर कौतुक यासाठी होतय कारण त्याच्यानंतर हार्दिक पंड्या होता. हार्दिक पंड्या स्वत:च गेम फिनिश करतो.

पार्ट्नर मैदानात अर्धशतकाच्या जवळ असताना हार्दिकने स्वत:च मॅच संपवली आहे. दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेलं कोण विसरेल.

तिलक वर्मा 49 धावांवर खेळत होता. त्यावेळी हार्दिकने थेट षटकार ठोकून टिम इंडियाला सामना जिंकवून दिला. पण त्यामुळे तिलकला अर्ध शतक पूर्ण करता आलं नाही. हार्दिकला या कृतीसाठी त्यावेळी स्वार्थी ठरवण्यात आलेलं.

राहुल आऊट झाला असता आणि हार्दिक बॅटिंगला आला असता, तर गिलची शतकाची संधी हुकली असती अशी चिंता फॅन्सन सतावत होती. राहुलने जोडीदाराला शतक पूर्ण करु दिल्याबद्दल त्याचं कौतुक होतय.

'चांगलं झालं, तिथे केएल राहुल होता, जर हार्दिक पंड्या असता तर...', अशा पोस्ट सोशल मीडियावर युजर्सनी केल्या आहेत.

"हार्दिक पंड्या भाई केएल राहुलकडून काहीतरी शिक. वर्ल्ड कप 2023 मध्ये विराटसाठी राहुलने त्याच्या फिफ्टीच बलिदान दिलं होतं, आणि आता शुभमन गिलसाठी" अशा कमेंट युजर्सनी केल्या आहेत.