
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात समृद्धपणे जगण्यासाठी बरेच सल्ले दिलेले आहेत. ते एक अर्थशास्त्री होतो. राजकारणातलाही त्यांचा अभ्यास चांगलाच मोठा होता. त्यांनी दिलेले काही उपदेश आजही तेवढ्याच गांभीर्याने पाळले जातात.

आचार्य चाणक्य यांनी कधीकधी आपण मूर्ख दिसणे फार फायद्याचे असते असे सांगितले आहे. आपली हुशारी आपण लपवली तर कधी-कधी फार मोठा फायदा होतो, असे चाणक्य नीती सांगते. सध्याच्या काळात हे सूत्र फारच उपयोगी पडते.

आपल्याला काहीच समजत नाही, आपण मूर्ख आहोत असे समोरच्या व्यक्तीला वाटले तर त्यात आपलाच फायदा असतो. आपल्या या प्रतिमेमुळे शत्रू गाफील राहतो. त्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर होतो, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार हुशार व्यक्ती नेहमी त्याची शक्तीस्थळं कोणालाही सांगत नाही. तो मी मूर्ख असल्याचेच लोकांना भासवतो. तुम्ही किती हुशार आहात, हे समोरच्या समजले तर तुम्हाला पराभूत करणे सोपे होते.

त्यामुळे तुम्हाला काहीच समजत नाही, असा संदेश समोरच्या व्यक्तीला गेला पाहिजे. यात तुम्हाला यश मिळाले की तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते, असेही चाणक्य नीती सांगते.