
धर्म नेहमीच मानवतेची शिकवण देतो. कोणतोही धर्म आपल्याला दया आणि प्रेम शिकवतो. जो धर्म तुम्हाला हिंसेचा मार्ग दाखवतो, दयेचा उपदेश न करता चुकीच्या मार्गावर नेतो, अशा धर्माचा त्याग करायला हवा असे आचार्य चाणक्यांचे मत होते.

पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास या महत्त्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा दोघांनाही नाते आणि कर्तव्याची जाणीव असते तेव्हा ते नाते जास्त काळ टिकते. पण जी पत्नी घरातील वातावरण दुषित करते. तिला खऱ्या अर्थाने जीवनसाथी म्हणण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीस सोडून देणेच योग्य.

जर तुमच्या भाऊ , बहिणीमध्ये प्रेम, आदर नाही ज्याला तुमच्या सुख-दु:खाची पर्वा नाही अशा भावाला किंवा बहिणीला दूर ठेवणेच योग्य असते. अशी नाती म्हणजे एक प्रकारची ओझीच असतात.

गुरू हा शिष्याचे भविष्य तयार करतो. म्हणून त्याला आई-वडिलांप्रमाणेच उच्च स्थान दिले आहे. पण जर तुमचा गुरू म्हाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तर अशा गुरुचा त्याग करा.