
आचार्य चाणक्य हे महान शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होतेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. आजही त्या गोष्टी लागू होतात.

वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं द्रुमालयः पत्रफलाम्बु सेवनम्। तृणेशु शय्या शतजीर्णवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्॥

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, माणसाने हिंस्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात राहावे, झाडावर घर बांधावे, फळे आणि पाने खावीत आणि पाणी पिऊन जीवन व्यतित करावं. जमिनीवर पेंढा पसरून झोपा किंवा झाडांची सालांनी शरीर झाकून घ्या. खिशात दमडी नसताना कधीही जवळच्या नातेवाईकांसोबत राहू नका, अन्यथा आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागेल.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला कधी ना कधी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळतो. पण जेव्हा आर्थिक स्थिती येते तेव्हा तो नातेवाईकांचे दार ठोठावतो.

धनहीन झाल्यानंतर तुम्ही जीवनातील सर्व त्रास सहन करा. पण नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींची मदत घेऊ नका. जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहाल तर तुम्हाला आयुष्यभर त्यांचे ऋणी राहावे लागेल.