
चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे. अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.