
तुमची कमजोरी कोणाला सांगू नका : आचार्य चाणक्य म्हणायचे की तुमची कमजोरी कोणाला सांगू नका. जे लोक आज तुमचे दु:खात साथिदार बनले आहेत उद्या सकाळ ते लोक तुमचे विरोधक होऊ शकतात.अशा परिस्थितीत तेच लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेतील. आणि त्यावेळी तुम्हा अजुनच संकटात जावू शकता.

आळस सोडा : आचार्य चाणक्य म्हणायचे की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आळस कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आळस केल्यामुळे तुमच्या हातामधून अनेक चांगल्या संधी जाण्याची शक्यता असते त्यामुळे माणसाने आयुष्यात आळसपणा करु नये.

वर्तमानात जगा: जे होऊन गेले ते बदलता येत नाही, पण जर तुम्ही वर्तमानात जगायला शिकलात तर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. तुमच्या भूतकाळातून धडा घ्या, वर्तमानात सुधारणा करा आणि भविष्यासाठी नियोजनावर काम करा. वर्तमानातील योग्य निर्णय तुमचे भविष्य बनवू शकतील.

फक्त स्वतःच्या बघण्यावर आणि ऐकण्यावर विश्वास ठेवा. इतरांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देवू नका.तुम्ही जे पाहता आणि ऐकता त्यावरच विश्वास ठेवा. इतर काय म्हणतात त्यात पडू नका. लोक तुम्हाला ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी तशाच असतील याची शाश्वती देता येत नाही.

कोणाचीही बदनामी करू नका : व्यक्तीच्या कर्माची शिक्षा वेळोवेळी मिळते असे आचार्य सांगत. व्यर्थ कोणाचीही बदनामी करू नका. यामुळे तुमच्या आत नकारात्मकता येईल आणि तुमचे मन नेहमी फक्त इतरांच्या नुकसानीचाच विचार करेल. त्यामुळे तुमचे विचार शुद्ध ठेवा