स्वस्त तिकिट, भरपूर शोज तरी प्रेक्षकांनी ‘या’ चित्रपटाकडे फिरवली पाठ

वीकेंडला तब्बल 5000 शोज लावून, तिकिटांवर मोठी सूट देऊनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन्स'च्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

| Updated on: May 25, 2026 | 2:32 PM
1 / 5
करण जोहर निर्मित 'चांद मेरा दिल' हा चित्रपट पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आहे. लक्ष्य आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु एक फ्रेश जोडी आणि तिकिटांवरील ऑफर यामुळे चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.

2 / 5
थिएटरमध्ये चांगले शोज लावूनही आणि समोर कोणत्याही मोठ्या चित्रपटाकडून टक्कर नसतानाही 'चांद मेरा दिल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करतोय. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास ऑफरसुद्धा दिली होती. प्रदर्शनाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 149 रुपये आणि त्यानंतर रात्रीपर्यंत फक्त 199 रुपये होती. या स्ट्रॅटेजीमुळे प्रेक्षक अधिकाधिक संख्येने थिएटर्समध्ये येतील, अशी निर्मात्यांना अपेक्षा होती.

3 / 5
स्वस्त तिकिटांची ऑफर देऊनही 'चांद मेरा दिल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी कसेबसे 3.31 कोटी रुपये कमावले आहेत. शनिवारी कमाईचा आकडा चार कोटी रुपयांवर पोहोचला होता. ट्रेंड रिपोर्ट्सनुसार रविवारी या चित्रपटाने फक्त चार ते पाच कोटी रुपयांदरम्यानच कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने फक्त 11 कोटी रुपयांपर्यंतचा गल्ला जमवला आहे.

4 / 5
जिथे सर्वसामान्य चित्रपटाला 2000 ते 2500 शोज मिळतात, तिथे वीकेंडला या चित्रपटाचे जवळपास 5000 शोज होते. लव्ह-स्टोरी हा नेहमीच करण जोहरच्या निर्मिती कंपनीचा ट्रेडमार्क राहिला आहे. परंतु गेल्या काही काळापासून त्याच्या रोमँटिक चित्रपटाचं गणित पूर्णपणे बिघडल्याचं दिसतंय. करणच्या प्रॉडक्शन हाऊसचे रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसत आहेत.

5 / 5
'चांद मेरा दिल' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगले रिव्ह्यू मिळाले नाहीत. 'वर्ड ऑफ माऊथ' अत्यंत कमकुवत असल्याने या चित्रपटाकडे प्रेक्षकवर्ग आकर्षित झाला नाही. अशातच चित्रपटातील अनन्या पांडेच्या भरतनाट्यम नृत्यावरूनही सोशल मीडियावर बरीच ट्रोलिंग होत आहे.

Follow Us