
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.


