Chhaava च्या आसपासही कोणी नाही, 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कुठले?

वर्ष 2025 मध्ये अनेक चित्रपट रिलीज झाले. पण या वर्षी चित्रपटाची एक्स्ट्राऑर्डिनरी कमाई पहायला मिळालेली नाही. सध्या रजनीकांतचा कुली आणि ऋतिक रोशनचा वॉर 2 चांगलं कलेक्शन करतायत. पण विकी कौशलच्या छावा चित्रपटात रेकॉर्ड मोडेल इतकं कलेक्शन या चित्रपटांनी केलेलं नाही. 2025 च्या पहिल्या 8 महिन्यात सर्वाधिक कमाई करणारे पाच चित्रपट कुठले? (आंकडेIMDb)

| Updated on: Aug 23, 2025 | 4:35 PM
1 / 5
विकी कौशलचा छावा चित्रपट बॉलिवूडमधील मागच्या आठ महिन्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. अनेक दिवस थिएटरमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत होता. भारतासह परदेशातही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. फिल्मच बजेट 130 कोटी रुपये होतं. जगभरात या चित्रपटाने 808.70 कोटी रुपयांची कमाई केली. मागच्या आठ महिन्यात एकही फिल्म छावा चित्रपटाला मागे टाकू शकलेली नाही.

2 / 5
कमी बजेटमध्ये आलेल्या सैयारा चित्रपटाने 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर कमाल केली. अनेक आठवडे हा चित्रपट थिएटरमध्ये होता. सुरुवातीला या चित्रपटाने चांगली कमाई केली. वॉर 2 आणि कुली चित्रपट आल्यानंतर सैयाराच्या कमाईला ब्रेक लागला. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सैयारा दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने जगभरात 542.40 कोटींची कमाई केली.

3 / 5
तिसरा नंबर येतो रजनीकांतच्या कुलीचा. हा चित्रपट रिलीज होऊन अजून 10 दिवसही झाले नाहीयत. भारतात या चित्रपटाच ठिकठाक कलेक्शन आहे. परदेशातही हा चित्रपट बंपर कमाई करतोय. जगभरात या चित्रपटाने 9 दिवसात 441.30 कोटीच कलेक्शन केलय.

4 / 5
कुलीसोबत वॉर 2 चित्रपट रिलीज झाला. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट कुलीच्या पाठोपाठच आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये मोठं अंतर आहे. कुली 450 कोटी कमाईच्या जवळ आहे. वॉर 2 ने अलीकडे 300 कोटीच्या कमाईचा आकडा पार केला. वॉर 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत चौथ्या नंबरवर आहे.

5 / 5
2025 मध्ये सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत हाऊसफुल चित्रपट पाचव्या नंबरवर आहे. मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 292 कोटींची कमाई केली. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत हा चित्रपट पाचव्या स्थानावर आहे.