
रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. महाराष्ट्रातील रायगडच्या महाड टेकडीवर हा किल्ला बांधला आहे, जिथे तुम्हाला सुंदर दऱ्यांचे मनमोहक दृश्य पाहता येते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यात झाला.

शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील पुणे येथील जुन्नर गावात आहे. या किल्ल्यात माता शिवाईचं मंदीर देखील आहे. त्यांच्या नावावरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. किल्ल्यात अनेक गुहा आहेत, त्या आज बंद आहेत.

सिंधुदुर्गचा भव्य किल्ला हा भारतातील सागरी किल्ल्यापैकी एक म्हणून ओळखला जातो. गडाच्या सभोवतालचे खडक प्राचीन काळी किल्ल्याचे संरक्षण करत असत. किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन कोकण येथील कुडाळ आहे, जे मालवण पासून 32 किमी अंतरावर आहे. हा किल्ला मुंबई ते गोवा रस्त्यावर आहे.

महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा पुरावा मानला जातो. शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील वादासाठीही हा किल्ला प्रसिद्ध आहे, ज्यात शिवाजी महाराज विजयी झाले.

लोहगड किल्ला मुंबई, गोवा आणि पुण्यातील लोकांसाठी खास ठिकाण आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा खजिना ठेवल्याचं सांगितलं जातं. किल्ल्यात अनेक प्राचीन मंदिरं आहेत, त्यापैकी शिवमंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख मानले जातात.