Controversial Bollywood Songs : ‘चुनर तेरी सरके’ तर आता आलं, याआधी बॉलीवूडमध्ये बनलेली डबल मिनिंगची 5 अश्लील गाणी
Controversial Bollywood Songs : कन्नड़ फिल्म केडी द डेविल मधील 'चुनर तेरी सरके' या गाण्याच्या अश्लील लिरिक्स वरुन विवाद सुरु आहे. हे गाणं यूट्यूबवरुन हटवण्यात आलय. यानंतर बॉलीवूडमधील वादग्रस्त गाण्यांची चर्चा सुरु झालीय.

चित्रपट सृष्टीत अशी अनेक गाणी बनतात, जी रिलीज झाल्यानंतर लिरिक्सवरुन वाद होतो. असचं कन्नड चित्रपटातील एक गाणं नुकतच रिलीज झालं'केडी: द डेविल'फिल्म हिंदीमध्ये सुद्धा रिलीज झालीय. हे गाणं ऐकल्यानंतर लोक भडकले.

गाण्याचं टायटल 'चुनर तेरी सरके' आहे. या गाण्यात बॉलीवूड एक्ट्रेस नोरा फतेही आणि अभिनेता संजय दत्त आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांनी ते व्हायरल केलं. गाण्याच्या अश्लील लिरिक्स वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर हे गाणं युट्यूब वरुन हटवण्यात आलं.

डबल मिनिंग लिरिक्सचं बॉलिवूडमध्ये असं गाणं बनण्याची ही पहिली वेळ नाहीय. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या 'चोली के पीछे क्या है' गाण्याचं येतं. फिल्म 'खलनायक' मधील हे गाणं आहे. रिलीज नंतरही या गाण्यावरुन वाद झाला.

वर्ष 2012 मधील चित्रपट 'राउड़ी राठौर' यातील 'आ रे प्रीतम प्यारे' गाण्यावरूनही वाद झालेला. वाद असूनही हे गाणं हिट ठरलं होतं. या गाण्याला ममता शर्मा औप सरोश सामी यांनी आवाज दिलेला.

फिल्म 'गब्बर इज बॅक' मधील गाण 'कुंडी मत खडाकाओ राजा' रिलीजनंतर चर्चेत आहे. या गाण्यात चित्रांगदा सिंह होती. याचे लिरिक्स अश्लीलतेसह डबल मिनिंग होते.रिलीज नंतर या गाण्यावर लोकांनी आक्षेप घेतला.