सिगारेटचा भाव प्रचंड वाढला! 95 रुपयांचे सिगारेटचे पॉकेट आता तब्बल… खिशाला मोठी झळ!

सिगारेट ओढणाऱ्यांसाठी आता वाईट बातमी आहे. कारण सिगारेट ओढणे आता जास्त खर्चिक झाले आहे. त्यामुळे आता सिगारेटचे चटकेच एका प्रकारे बसू लागले आहेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Feb 09, 2026 | 10:32 PM
1 / 5
धुम्रपान हे आरोग्यास हानिकारक असते. सिगारेट, विडी, तंबाखूच्या पॉकेटवर तसे स्पष्टपणे लिहिलेले असते. परंतु तरीदेखील लोक धुम्रपान करतातच. आरोग्यास हानिकारक असलेल्या सिगारेटबद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे.

धुम्रपान हे आरोग्यास हानिकारक असते. सिगारेट, विडी, तंबाखूच्या पॉकेटवर तसे स्पष्टपणे लिहिलेले असते. परंतु तरीदेखील लोक धुम्रपान करतातच. आरोग्यास हानिकारक असलेल्या सिगारेटबद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे.

2 / 5

केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सिगारेटवरील कर वाढवला आहे. हा कर संपूर्ण देशात 1 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. या करवाढीनंतर देशात लोकप्रिय असणाऱ्या सिगारेट ब्रँड्सची किंमत चांगलीच वाढली आहे.

3 / 5

आकड्यांतच सांगायचे झाल्यास अगोदर 10 रुपयांचे गोल्ड फ्लेक सिगारेटचे पॉकेट 95 रुपयांना यायचे. आता याच पॉकेटची किंमत 140 रुपये झाले आहे. म्हणजेच सिगारेटच्या पॅकेटमागे साधारण 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे आता रोज सिगारेट कशी ओढावी, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

4 / 5

भारतात तंबाखूजन्य पदार्थांवरील आकारण्यात येणाऱ्या करपद्धतीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळेच सिगारेट महागली आहे. अर्थसंकल्पात सिगारेटची लांबी, फिल्टर तसेच अन्य बाबी लक्षात घेऊन टॅक्स स्लॅब निश्चित करण्यात आला आहे. सेस आणि कम्प्लायंस वाढल्यानेही सिगारेट निर्मिती कंपन्यांच्या डोक्यावर कराचे ओझे वाढले आहे.

5 / 5

अगोदर एका सिगारेटची किंमत दरा रुपये असायची. आता हीच सिगारेट 12 ते 13 रुपये झाली आहे. म्हणजेच प्रत्येक सिगारेटमागे 2 ते तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 75 ते 85 एमएम लांबी असलेल्या सिगारेटचा भाव 22 ते 28 टक्क्यांनी वाढला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us