
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. शाहरुख खान याचे फक्त देशातच नाही तर विदेशातही फॅन आहेत.


कॅन्सरच्या शेवट्या टप्प्यात शिवानी चक्रवर्ती असून त्यांनी एक अत्यंत मोठी मागणी केलीये. शिवानी चक्रवर्ती यांना शाहरुख खान याला भेटण्याची प्रचंड इच्छा आहे. शाहरुख खान याचे सर्वच चित्रपट त्यांनी बघितले आहेत.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट देखील त्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघितला आहे. शिवानी चक्रवर्ती या 60 वयाच्या असून त्यांच्या मुलींनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवानी चक्रवर्ती यांच्या मुलीने शाहरुख खान याला देखील हा व्हिडीओ टॅग केलाय. आता शाहरुख खान हा खरोखरच शिवानी चक्रवर्ती यांची इच्छा पुर्ण करतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.