अंकिता आणि अभिजीतमध्ये टोकाचे वाद; फिनाले आधी भांडण

Bigg Boss Marathi House : 'बिग बॉस मराठी' आता अंतिम टप्प्यात आला आहे. फिनाले आधी 'बिग बॉस मराठी'च्या घरात कडाक्याचं भांडण झालं आहे. अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात वाद झालेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर बातमी...

आयेशा सय्यद | Updated on: Sep 30, 2024 | 3:43 PM
1 / 5
'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजेच 6 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी 'बिग बॉस मराठी'च्या घरात मोठा वाद झाला आहे. ही भांडणं शेवटच्या आठवड्यात खेळाला वेगळा रंग देत आहेत.

'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजेच 6 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी 'बिग बॉस मराठी'च्या घरात मोठा वाद झाला आहे. ही भांडणं शेवटच्या आठवड्यात खेळाला वेगळा रंग देत आहेत.

2 / 5

'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात टोकाची भांडणं झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील ही भांडणं सध्या चर्चेत आली आहेत.

3 / 5

घरातील स्वच्छतेच्या कामावरून या दोघांमध्ये वाद झाला आहे. निक्कीला कमी काम दिल्याने अंकिता चिडली आहे. तिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरूम साफ करणार आहेस!, असं अंकिता अभिजीतला म्हणाली.

4 / 5

अभिजीतही अंकिताला उत्तर देतो. तुला जर एवढे वाटत आहे ना की तुझ्या ड्यूटीज जास्त आहेत तर तू निक्कीला बोलना, असं अभिजीत म्हणाला. मग अंकिताही त्याला उत्तर देते.

5 / 5

तू नेहमी जेंटलमॅन बनून फिरत असतो ना, मग आज पण जेंटलमॅन बन..., असं अंकिता अभिजीतला म्हणते. मी माझी ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो. यामध्ये मी चुकीचा काय आहे, असं अभिजीत म्हणतो. यावरून अंकिताचा राग अनावर झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us