
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी नुकताच लग्न बंधणात अडकला आहे. त्याची मैत्रिण राधा पाटीलसोबत अभिषेकने लग्न केले आहे.

या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे लग्न मालवण येथे पार पडले. 17 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडला.

विशेष म्हणजे हे लग्न साध्या पध्दतीने पार पडले. लग्न पारंपारिक पद्धतीने व्हावे अशी मिलिंद गुणाजी यांचीच इच्छा होती.

अभिषेक हा आय.टी. इंजिनियर आहे. तर त्याची पत्नी राधा मुंबईत असते आणि फार्मा उद्योगात काम करते.

अभिषेकने सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी अभिनीत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे.