
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नवनवीन फोटोशूट शेअर करत तो चाहत्यांशी कनेक्ट होतो. आता सिद्धार्थ चांदेकर सध्या त्याच्या लिखाणामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

आता नुकतंच त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. पाहा सिद्धार्थची खास पोस्ट.

नेहमी क्लासी अंदाजात फोटो शेअर करणाऱ्या सिद्धार्थनं आता आपल्या लिखाणातून चाहत्यांना वेड लावलं आहे.

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. त्याच्या या खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.