
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा ईशाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये ईशा गुप्ता व्हाईट टॉप, ब्लॅक ब्लेझर आणि ब्लॅक पँटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये, ईशा गुप्ता तिच्या कानात झुमके, हातात अंगठी परिधान केली आहे आणि केसांची पोनीटेल बांधलेली दिसत आहे.

यादरम्यान ईशाचा स्मोकी मेकअप आणि लूक पाहून चाहते घायाळ होत आहेत. सोशल मीडियावर ईशा गुप्ताचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ईशा गुप्ता नुकतीच 'नकाब' या वेब सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसली. तसेच ईशा 'इनव्हिजिबल वुमन' वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या लूक, स्टाईल, बोल्डनेस आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.