
अभिनेत्री जान्हवी कपूर... जान्हवी स्लायलिश राहणीमानासाठी चर्चेत असते. वेगवेगळे आऊटफिट जान्हवी परिधान करत असते. आताही तिने क्लासी आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत.

ब्लॅक कलरचा क्लासी आऊटफिट जान्हवीने परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसवर रंगीबेरंगी डिझाईनदेखील आहे. जान्हवीचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

जान्हवीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. साडे आठ लाख लोकांनी तिच्या फोटोंना पसंती दिली आहे.

ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याचं ही एकमेव कारण आहे, अशी उपरोधित टिपण्णी जान्हवीच्या चाहत्याने केली आहे. खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट दुसऱ्या एका नेटकऱ्याने केली आहे.

हा लूक तुझ्यावर खूपच सुंदर दिसतोय. काहीही म्हणा पण जान्हवी इतकं कुणीही सुंदर दिसू शकत नाही, अशी कमेंट जान्हवीच्या चाहत्याने केली आहे. अशीच 'चमकत' राहा, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.