
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नव्हते, परंतु आता दोघेही एकमेकांबद्दल उघडपणे बोलतात.

सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. आता अलीकडेच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अर्जुन कपूर आणि तिच्या आवडींबद्दल बोलतेय.

मलायका अरोरा एमटीव्हीवरील 'सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2' या शोमध्ये झळकणार आहे.

मिलिंद सोमण हा शो होस्ट करत आहेत. आता MTV नं सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद तिला विचारतात की, तिला कसा मुलगा आवडतो किंवा आयडियल मॅन कसा असावा.

यावर मलायकानं उत्तर दिलं की, 'मला रफ मुलं आवडतात. जी मस्त पद्धतीने फ्लर्ट करतात. जे उत्तम किस करू शकतात आणि हो मला सुंदर मुलं आवडत नाहीत.'

मलायकाने या शोदरम्यान मिलिंद सोमण यांना असंही सांगितलं की, अर्जुन कपूर सर्वोत्तम किसर आहे. मिलिंद सोमण यांनी मलायकाला पुढे विचारलं की, तिने अर्जुन कपूरला पाठवलेला शेवटचा मॅसेज कोणता होता? यावर मलायका अरोरा लाजत म्हणाली, ‘आय लव्ह यू 2.’