
अभिनेत्री पूनम पांडे हिचं सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सरमुळे तिचं निधन झालं आहे. वयाच्या केवळ 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय.

निधनाच्या सहा दिवस आधी पूनमने फोटो शेअर केले होते. तसंच मृत्यूच्या दोन दिवस आधी पूनमने एक व्हीडिओही शेअर केला होता.

पूनमने बॅकलेस आऊटफिटमधील फोटो शेअर केले. त्याला तिने विशेष कॅप्शन दिलं होतं.

आउटफिटच्या निवडी आणि कपाटातील अस्ताव्यस्त गोंधळ यांच्यात मी सापडले आहे. हा वास्तविक संघर्ष आहे, असं कॅप्शन पूनमने या फोटोंना दिलंय.

पूनमच्या निधनानंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. एवढ्या कमी वयात पूनमने जगाचा निरोप घेणं धक्कादायक असल्याचं चाहते म्हणत आहेत.