
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत.

नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवास्थानी जात प्राजक्ताने नितीन गडकरी यांची भेट घेतली. तेव्हा चहापानाचा कार्यक्रमही झाला.

महाराष्ट्राची हास्यजत्रा, आगामी प्रोजेक्ट्स, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग, या विषयांवर चर्चा झाल्याचं प्राजक्ता म्हणाली.

नितीन गडकरी यांच्या कामावर लिहिली गेलेली 8-9 पुस्तकं गडकरींनी प्राजक्ताला भेट दिली. तसंच नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडीदेखील भेट दिल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

या अर्ध्या तासाच्या भेटीत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. त्यांच्या परिवाराला भेटले. आयुष्यभर स्मरणात राहील, अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल आभार, असं म्हणत प्राजक्ताने नितीन गडकरी यांचे आभार मानलेत.