
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा आला आहे. 'फुलवंती' हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. 'फुलवंती' सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्राजक्ताच्या मुलाखती सुरु आहेत.

'फुलवंती' सिनेमासाठीच्या एका मुलाखतीत प्राजक्ताने एक खुलासा केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्रसंचालन करण्यासाठी ती कशी तयार झाली? याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.

आधी मला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चं सूत्र संचालन करण्यासाठी विचारण्यात आलं. तेव्हा मी नाही म्हणून सांगितलं. कारण त्याआधी मी फक्त एकाच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं, असं प्राजक्ता म्हणाली.

पण मग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' साठी मला पुन्हा एकदा फोन आला. पेमेंट वाढवून दिलं आणि आता तू होकार दे असं सांगितलं. पण माझा आणि कॉमेडीचा काहीच संबंध नाही. मी पंच पाडेन, असं मी त्यांना सांगितलं.

तेव्हा माझा एक मित्र माझ्या शेजारी बसला होता आणि तो म्हणाला की तू एकदा ट्राय करून बघ... तुला आवडलं जमलं तर ठीक आहे. नाही तर मग नको करू. तो म्हणाला म्हणून मी होकार दिला अन् मला ते जमलं. आता आजही मी तो कार्यक्रम होस्ट करते, असं प्राजक्ता म्हणाली.