
‘बिग बॉस 14’ची विजेती रुबीना दिलैक चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. रुबीना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

'छोटी बहू' या मालिकेने आपल्या कारकीर्दीत यश मिळविलेली रुबीना ही सध्या अभिनयाबरोबरच विवाहित जीवन आनंदाने व्यतीत करत आहे.

नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर करत स्पष्ट केले आहे की, ती आता केवळ पती अभिनव शुक्लासोबत दर्जेदार वेळ घालवू इच्छित आहे. अलीकडे अभिनेत्रीने विमानतळावरची काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

रुबीनाने शेअर केलेल्या फोटोंमधून हे दोघेही सुट्टीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

रुबीनाने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘2 महिने 20 दिवस, मी तुझी वाट बघत होते. दररोज दिवस मोजत होते. आता तू माझ्याबरोबर आहेस आणि आपण एकत्र उडण्यास तयार आहोत.’

रुबीनाची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. फोटोंमध्ये दोन्ही कलाकारांची क्युट स्टाईल दिसत आहे. रुबीना आपल्या पतीसोबत कुठे फिरायला गेली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.