
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत राहते. बिग बाॅस ओटीटीमधून उर्फी जावेद हिला खरी ओळख मिळालीये. उर्फी जावेद हिला बऱ्याचदा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

उर्फी जावेद हिची नवीन अतरंगी स्टाईल पाहून सर्वांनाच आता मोठा धक्का बसला आहे. उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

आता उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उर्फी जावेद हिने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, हे बांबूच्या टोपली (दुरडी) पासून बनवले आहे, बांबूच्या दोऱ्यांचा वापर करून कारागीर एवढी छान भांडी, खुर्च्या, टेबल कसे बनवतात, असा प्रश्न मला नेहमी पडतो.

आता उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी उर्फी जावेद हिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका युजर्सने म्हटले की, ही उर्फी काहीही करते, ही कधी काय करेल हे सांगणे थोडे कठीणच आहे.

दुसऱ्याने लिहिले की, थोडी लाज ठेवा...आता सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्या या लूकचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.