
राहुल वैद्य आणि दिशा परमार हे टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घ काळ रिलेशनशिपनंतर दोघांनी या वर्षी जुलैमध्ये लग्न केलं. लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे लोक उपस्थित होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

लग्नानंतर, राहुल आणि दिशा हनीमूनला गेले नाहीत कारण दोघंही आपापल्या कामाचे कमिटमेंट पूर्ण करत होते. पण आता दोघं एकत्र फिरायला बाहेर गेले आहेत.

बुधवारी दिशा आणि राहुल विमानतळावर दिसले. यादरम्यान दोघंही कॅज्युअल लुकमध्ये दिसले. दोघंसोबत खूप गोड दिसत होते.

दिशा आणि राहुल कुठे फिरायला जात आहेत हे अद्याप माहित नसलं तरी हे दोघंही आता त्यांच्या हनिमूनला निघाले आहेत.

दिशा आणि राहुल यांनी नुकतंच लग्नानंतर प्रथमच गणेश चतुर्थी साजरी केली. सध्या दिशा ‘बडे अच्छे लगते हैं 2’ या शोमध्ये दिसत आहे. दिशा आणि नकुलची जोडी शोमध्ये खूप पसंत केली जात आहे. दुसरीकडे, राहुल खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसला.