
नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमांना सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात कंगना रनौतने हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत दांडिया नाईट्सला हजेरी लावली. यावेळी कंगनाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. कंगनाच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

कंगनाने या दांडिया नाईट्समध्ये उपस्थितांशी संवाद साधला. तसंच कंगनाने देवीची पूजाही केली. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

गुजरात माझं हृदय आहे. 'तेजस'सोबत अहमदाबादच्या गरबा लाईट्सला हजेरी लावली, असं म्हणत कंगनाने या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 'तेजस' हा तिचा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

क्विन म्हणत चाहत्यांनी कंगनाच्या या लूकला पसंती दिली आहे. एव्हरग्रीन सौंदर्य म्हणत चाहत्यांची कंगनाच्या फोटोवर कमेंट पाहायला मिळत आहे.