
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री रेखा या लग्नसोहळ्याला उपस्थित होत्या. लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्री रेखा...

मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन... ऐश्वर्या तिची लेक आराध्यासोबत या लग्न सोहळ्याला हजर होती. लाल रंगच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या अधिकच सुंदर दिसत होती.

बॉलिवूडची देसी गर्ल, मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राने राधिका-अनंतच्या लग्नाला हजेरी लावली. पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये प्रियांका अधिकच सुंदर दिसत होती.

अभिनेत्री क्रिती सनोनचा हा खास लूक... क्रितीचा गुलाबी रंगाचा लेहंगा सिंपल पण तितकाच सुंदर होता. या लेहंग्यात क्रितीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. क्रितीचा 'परमसुंदरी' लूक चर्चेत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने गोल्डन थीमचा आऊटफिट परिधान केला होता. एखादी ज्वेलरी वाटावी असा हा जान्हवीचा हा लेहंगा होता. त्यावरचं बारीक नक्षीकाम लक्ष वेधून घेत होतं.