
कलर्सच्या लोकप्रिय शो उत्तरनमध्ये इच्छाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. स्वतः टीनानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये टीना अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. फोटोंमध्ये टीना पांढऱ्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने फोटोमध्ये अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत. टीनानं हेवी मेकअप केला आहे आणि कमी लाईटमध्ये हे फोटो क्लिक केले आहेत.

कलर्सच्या शो उत्तरनमध्ये इच्छाची भूमिका साकारणाऱ्या टीना दत्ताला याआधी चाहत्यांनी या अवतारात पाहिले आहे. नुकतंच ती तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता केवळ बोल्डमध्येच नाही तर थीमवर आधारित फोटो शूटमध्येही दिसली आहे. त्यामध्ये तिनं भाजी मार्केट आणि फिश मार्केटमध्ये फोटोशूटही केले होते.