
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये Sun Drenched असं लिहिलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत,

‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले.

‘ॲनिमल’ सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे तृप्ती एका रात्रीत नॅशनल क्रश म्हणून ओळखीस आली... अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

तृप्ती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या बॉयफ्रेंड सॅम मर्चंट याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.