
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद निर्माण झाला. सतत या चित्रपटाला मोठा विरोध केला जातोय.

द केरळ स्टोरी चित्रपटाच्या विरोधात कमल हसन यांनी अत्यंत मोठे विधान केले होते. हा चित्रपट सत्यावर आधारित नसल्याचे देखील कमल हसन यांनी म्हटले.

आता द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल अनुराग कश्यप यांनी मोठे भाष्य केले आहे. अनुराग कश्यप यांनी थेट द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रचार करणारा चित्रपट असल्याचे म्हटले.

अनुराग कश्यप म्हणाले, आजच्या युगात राजकारणापासून कोणीही सुटलेले नाही. आजकाल चित्रपट बिगर-राजकीय असणे खूपच अवघड आहे.

द केरळ स्टोरी या चित्रपटा सारखे अनेक प्रचार चित्रपट बनवले जात आहेत. कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याच्या विरोधात आहे, परंतु हा चित्रपट एक प्रचारात्मक चित्रपट आहे, असे माझे ठाम मत नक्कीच आहेत.