
यावेळीही देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या घरी आणि कार्यालयात बाप्पाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यात मग्न आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दिव्या खोसला कुमार आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या टी-सीरिज कार्यालयात गणेश पूजेचं आयोजन केलं. काल अनेक कलाकार टी-सीरिजच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

रोहित शेट्टीनं भूषण कुमारसोबत टी-सीरिज ऑफिसमध्ये विशेष भेट घेतली.

यावेळी रोहित शेट्टीने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं.

तुलसी कुमारनं गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागितले.

अनुराधा पौडवाल यांचे टी-सीरिजशी असलेले नाते 20 वर्षे जुनं आहे, त्या गणेश जींच्या दर्शनासाठी येथे पोहोचल्या होत्या.

प्रसिद्ध टीव्ही स्टार पार्थ समथान देखील येथे पोहोचला होता.