
अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांची मनं जिंकत असते. प्रत्येक वेळी ती तिच्या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना आश्चर्यचकित करते. सोशल मीडियावर लाखो लोक अवनीतला फॉलो करतात. तिचा प्रत्येक फोटो पोस्ट करताच व्हायरल होतो.

अवनीतने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती क्रॉप टॉपसह पांढरी पँट परिधान करुन दिसत आहे. यासोबत तिनं अॅक्सेसरीज सुद्धा कॅरी केली आहे.

फोटोंमध्ये अवनीत अनेक पोज देताना दिसत आहे. तिच्या या पोझनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

एका चाहत्याने अवनीतच्या फोटोवर लिहिले - वाह, तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले - सुंदर. तसेच अनेक चाहते फोटोवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

अवनीत फक्त 19 वर्षांची आहे आणि तिनं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये सुद्धा दिसली आहे.